अरेच्या ! कोणालाही माहीत नव्हते ‘संदिप खरे’ यांच्या मुलीबद्दल, आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पहा दिसते अतिशय सुंदर..

मनोरंजन
मराठी कलाविश्व खूप मोठं आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या उत्तम अश्या कौशल्याने, संपूर्ण कलाविश्वावर स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. असे अनेक दिग्ग्ज कलाकार आहेत, जे प्रतिभासंपन्न असून देखील कायमच स्वतःला प्रकाशझोतापासून दूर ठेवतात. त्यांची प्रतिभा आणि कौशल्य बघता, जगभरात कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवतात.
मात्र असे असले तरीही, स्वतःच्या खाजगी आयुष्याच्या बाबतीत ते नेहमीच काळजी बाळगतात. त्यामुळे, त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी कोणाला माहिती मिळत नाही. पण, आज सगळ काही डिजिटल झालं आहे. या सोशल मीडियाच्या जगात, कितीही खाजगी बाळगण्याचा प्रयत्न केला तरीही, ती हवी त्या प्रमाणात बाळगता येत नाही.
मात्र, याच सोशल मीडियाच्या म्हणजेच डिजिटल युगामुळे, अनेक कलाकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांची नव्याने ओळख त्यांच्या चाहत्यांना झालेली आपल्याला बघायला मिळते. याच काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत, प्रसिद्ध गीतकार आणि लेखक संदीप खरे. संदीप खरे यांना,नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये.
आयुष्यावर बोलू काही, या कार्यक्रमाद्वारे संदीप खरे यांनी घराघरात नवीन ओळख मिळवली. या कार्यकारमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अग्गबाई ढग्गबाई, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, आरस्पानी असे अनेक प्रसिद्ध लोकप्रिय संग्रह संदीप खरे यांनी प्रदर्शित केले आहेत. त्यांच्या या कवितासंग्रहात रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संदीप खरे, सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपल्या कुटुंबासोबतचेच फोटो ते आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोजला चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होतो. त्यांनी शेअर केलेल्या फोटोजमध्ये प्रामुख्याने लक्ष वेधून घेते ती, त्यांची मुलगी रुमानी खरे. रुमानी खरे, एक उत्तम नृत्यांगना आहे.
शास्त्रीय नृत्यामध्ये ती पारंगत असून, अनेक कार्यक्रमांमध्ये तिने आपला सहभाग नोंदवला आहे. रुमानी अनेक वेगेवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, आपले सुंदर असे नृत्य करत असते.अनेक वेळा आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून ती, आपले नृत्याचे व्हिडियोज शेअर करत असते. त्यावर देखील चाहते भरभरून प्रतिसाद देतात. रुमानीचे सौंदर्य आणि ग्लॅमरस अवतार बघून, अनेक चाहते तिला सिनेमामध्ये काम करण्यासाठी देखील प्रवृत्त करतच असतात.
रुमानीला देखील, अभिनयाची प्रचंड आवड आहे. अनेक नाटकांचे प्रयोग ती मुद्दाम जाऊन बघते. आणि जेव्हा नाटकांच्या प्रयोगांचा सराव सुरु असतो तेव्हा, त्यासाठी देखील रुमानी आवर्जून हजेरी लावते. तिच्या या कलाप्रेमाला लक्षात घेता, तिचे कुटुंब देखील तिला त्यासाठी प्रवृत्त करत आहे.
चिंटू आई चिंटू २ च्या दोन्ही सिनेमामध्ये, रुमानीने बालकलाकर म्हणून काम केले आहे. तिने बालकलाकार म्हणून जरी काम केले असले, तरीही तिचा अभिनय भल्या-भल्याना माघे सोडणार होता.त्यामध्ये तिच्या कामाचे भरभरून कौतुक करण्यात आले होते.नुकतंच ‘आई पण बाबा पण’या लोकप्रिय नाटकामध्ये ती झळकली होती.