अरेच्या ! अनंत जोग यांची पत्नीचं नाही तर मुलगी देखील आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल…..

अरेच्या ! अनंत जोग यांची पत्नीचं नाही तर मुलगी देखील आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल…..

आपण अनेक वेळा पाहिले आहे की,डॉक्टरांची मुलगी किंवा मुलगा डॉक्टर बनतात. किंवा वकिलांचे मुलं वकील बनतात.

काही कुटुंब असे असतात की, त्यांचे हे उत्कृष्ट अनुवंशिक गुण आपल्या मुलांमध्ये येतात. आणि संपूर्ण कुटुंब कधी डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे बघायला मिळते. त्याच प्रकारे आपल्याला राजकारणात आणि इतर क्षेत्रात देखील बघायला मिळते. खासकरून कलाक्षेत्रात हे खूप वेळा आपण पाहिले आहे.

एखाद्या अभिनेत्याची मुलगी किंवा मुलगा कला क्षेत्राची निवड करतात. मात्र सर्व जणांना त्यामध्ये यश मिळतेच असे नाही. काही जण यशस्वी होतात तर, काहींना यश मिळण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागतो. कौशल्य असेल तर ते नक्कीच यशस्वी होतात, मात्र कौशल्य नसेल तर यश मिळवण्यासाठी त्यांना वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागतो.

सहाजिकच आपल्या पालकांसोबत त्यांची तुलना होते आणि त्या तुलनेत ते वरचढ सिद्ध होतातच असे नाही. त्यामुळे हे सर्व आपण अनेक वेळा पाहिले आहे मराठी कलाक्षेत्रात देखील आपण अशी कुटुंब पाहिले आहेत. सचिन आणि सुप्रिया यांची मुलगी श्रेया पिळगावकर ही देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

अनेक सिनेमांमध्ये आणि वेबसीरीज मध्ये आपल्या अभिनयाने तिने स्वतःचे कौशल्य सिद्ध केले आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडणार्‍या अनंत जोग, यांना कोणत्याही नवीन ओळखीची गरज नाही. अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

खासकरून विनोदी आणि खलनायकाच्या भूमिका त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारले आहेत. सिंघम सिनेमातील त्यांची नेत्याची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. सिने सृष्टीतील दिग्गज खलनायकांच्या यादीत अनंत जोग यांचे देखील नाव आहे. केवळ सिंघमच नाही तर, रॉवडी राठोड, कच्ची सडक, दहेक यासारख्या सिनेमांमध्ये देखील अनंत जोग यांनी आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच दाद कमावली होती.

त्यांच्या प्रमाणे त्यांच्या पत्नी उज्ज्वला जोग यादेखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. खास करून मराठी नाटकांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इतक्या उत्कृष्ट कलाकार जोडप्याची मुलगी देखील, उत्कृष्ट कलाकार नसती तर आश्चर्य असते.

दामिनी या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली क्षिती जोग ही अनंत आणि उज्वला जोग यांची मुलगी आहे. केवळ मराठीच नाही तर, हिंदी मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे. साराभाई वर्सेस साराभाई, ये रिश्ता क्या केहलाता हे, यासारख्या हिट मालिकांमध्ये क्षिती झळकली आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये देखील तिने काम केले आहे.

बाबुल कि गुडिया घर की लक्ष्मी बेटीया, या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत होती. या मालिकेतील तिच्या कामाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. मराठी अभिनेता हेमंत ढोमे सह काही वर्षांपूर्वी तिने लग्न केले. आणि आता सुखाने आपला संसार करत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *