अमेय वाघची पत्नी दिसते मराठी अभिनेत्रींपेक्षाही कैक पटीने सुंदर आणि देखणी..पहा फोटो…

अमेय वाघची पत्नी दिसते मराठी अभिनेत्रींपेक्षाही कैक पटीने सुंदर आणि देखणी..पहा फोटो…

मराठी चित्रपटसृष्टीमधील अमेय वाघ हे चांगलंच मोठं नाव आहे. सुरुवातीपासूनच अमेय ने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर लोकप्रियता प्राप्त केली आहे. तो मराठी मधील खूप कमी अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी, रंगभूमी, मालिका, सिनेमा आणि वेबसिरीज अश्या सर्वच क्षेत्रात आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे.

राणी मुखर्जीच्या ऐय्या सिनेमामध्ये आपल्या छोट्याशा भूमिकेमधून देखील अमेयने आपल्या हटके शैलीची छाप सोडली होती. दिल दोस्ती दुनियादारी, धुराळा, मुरंबा आणि गर्लफ्रेंड यामधील त्याच्या कामाचे खास असे कौतुक करण्यात आले. गर्लफ्रेंड सिनेमाच्या वेळी सई सोबतच त्याच्या खऱ्या गर्लफ्रेंड म्हणजेच त्याच्या बायकोच्या बद्दल जाणून घेण्यात लोकांनी चांगलाच रस दाखवला होता.

अमेय नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून आपल्या आयुष्यातील घडामोडींची माहिती देत असतो. चाहते देखील त्याच्या फोटोज किंवा व्हिडियोज ची वाट बघतच असतात. त्याने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर केलेल्या व्हिडियो ने मात्र सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगवली आहे. हा व्हिडियो, अमेय च्या बायकोचा आहे.

साजिरीचा आजवाढदिवस आहे, आणि त्यामुळे एखाद्या प्रेमळ नवऱ्याप्रमाणे अमेय ने देखील तिला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी अनेक वर्षांपासून तिच्या वेडेपणाच्या प्रेमात आहे. पण हा वेडेपणा ज्या मुलीच्या प्रेमात आहे तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे’ असे अमेयने त्यात लिहले आहे. २०१७ मध्ये अमेय आणि साजिरी चे लगान झाले.

मात्र त्याआधी ते दोघे १३ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. पुण्यात कॉलेज मध्ये शिकत असताना अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे ची लव्हस्टोरी सुरु झाली होती. आणि २०१७ मध्ये त्यांनी लग्न केले. आमच्या कॉलेजमधील नाटकाची तालीम पाहायला साजिरी जात असे. साजिरीने अमेय ला तिथेच पहिले आणि त्याच्या प्रेमात पडली.

मग त्याला भेटण्यासाठी काही वेगवेगळे बहाणे असे करत त्या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. साजिरी दिसायला खूपच सुंदर आहे. आपल्या इंस्टाग्राम वर तिचे अनेक फोटो तो नेहमीच शेअर करत असतो. ‘साजिरी, तू कितीही गोड हसलीस तरी मी तुझ्याकडे बघीनच असं नाही! तू प्रेमाने बोललीस तरी तुझं मी सगळं ऐकीनच असं नाही! पण तुझी शपथ तू कितीही जेवलास तरी आयुष्यभर तुझे भांडे घासीन!

वाढदिवसाचा चकचकीत शुभेच्छा! तुझाच, बायकोच्या ताटाखालचा वाघ!’ असे त्याने आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे. साजिरीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठी सिनेसृष्टीमधून देखील अनेक कलाकार देत आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्स द्वारे तिच्यावर आपल्या प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.