अमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का ? अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम !

आपल्याला आपल्या लाडक्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यात थोडा जास्तचं रस असतो. त्यांच्या फॅशन, बॉयफ्रेंडपासून ते कुटुंबापर्यंत जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मराठी चित्रपटसृष्टीतसुद्धा अभिनेत्री आहेत सुद्धा तितक्याच सुंदर आणि स्टायलिश आहेत. आज आपण मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृता जितका सुंदर अभिनय करते. तितकीच सुंदर ती दिसतेसुद्धा. अमृताने मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. महाराष्ट्रा त तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृताने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अमृताने ‘राजी’ चित्रपटात महत्वाची सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र अमृतासुद्धा चित्रपटात भाव खाऊन गेली होती. अमृताबद्दल आपण सर्वजण जाणतो. मात्र तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मूळात अमृताला एक बहीणसुद्धा आहे हे अनेकांना माहिती नसेल.
आज आपण तिच्या बहिणीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. अभिनेत्री अमृता खानविलकर मोठी बहीण आहे. तिचं नाव आदिती ‘खानविलकर बक्षी’ असं आहे. अमृताच्या बहिणीचं दीपक बक्षी या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे. विशेष म्हणजे अमृताची बहीण आदिती ही एक एयर होस्टेस आहे. आणि ती दुबईमध्ये स्थायिक आहे.
आदितीला एक गोंडस मुलगीसुद्धा आहे. अमृताने ३ वर्षांपूर्वी आदितीच्या डोहाळे जेवणाचा फोटो सोशल केला होता. अमृता अनेकदा आपल्या बहिणीसोबत दिसून येते. अमृताची बहीण तिच्या इतकीच सुंदर आणि फिट आहे. अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अमृताने अनेकवेळा आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिसायला दोघीही जवळजवळ सारख्याच आहेत.
नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये अमृता बहीण आदिती आणि आपल्या आईसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. लॉकडाऊन दरम्यान अमृताने आपल्या बहिणीच्या मुलीसोबतचे काही गोड व्हिडीओसुद्धा शेअर केले होते. या मावशी आणि भाचीचे हे व्हिडीओ चाहत्यांना फारच पंसत पडले होते.