अमीर खानचा मुलगा जुनैद खान करणार बॉलीवूड मध्ये एंट्री, पहा रनविर सिंगच्या या अभिनेत्रीसोबत करणार पहिल्यांदा काम…

अमीर खानचा मुलगा जुनैद खान करणार बॉलीवूड मध्ये एंट्री, पहा रनविर सिंगच्या या अभिनेत्रीसोबत करणार पहिल्यांदा काम…

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुले सुद्धा चाहत्यांसाठी आणि मिडियासाठी आकर्षणाचा विषय ठरत असतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहान मोठ्या गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. आता आमिर खानच्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान या बद्दल सध्या बरीच चर्चा आहे. सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान आजकाल बॉलिवूडमध्ये इंट्री तयारी करत असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे अभिनेता आमिर खान स्वत: आपल्या मुलाला चित्रपट देत नाहीये.

त्याऐवजी त्याला यशराज फिल्म्स चित्रपटात घेवून येणार आहेत. जुनैद खान यशराज बॅनरखाली बनवलेल्या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे. या प्रकरणात आता एक मनोरंजक माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटासाठी एका सुंदर अभिनेत्रीला साइन करून घेतले आहे.

इतकेच नव्हे तर या अभिनेत्रीचे नाव ऐकल्यानंतर चाहतेही आनंदित होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अर्जुन रेड्डी चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडेची जुनेद खानसाठी निवड झाली आहे. या अभिनेत्रीचा हा दुसरा हिंदी चित्रपट असेल. यापूर्वी शालिनी पांडेने आणखी एक यशराज बॅनर चा चित्रपट साइन केला आहे. ज्यामध्ये ती रणवीर सिंगच्या विरुद्ध दिसणार आहे.

जयेश भाई एम्पॉवर असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचा पहिला लूक यापूर्वीच रिलीज झाला आहे. आता शालिनी पांडे जुनैद खानसमवेत यशराज बॅनरच्या चित्रपटात दिसणार आहे. एवढेच नाही तर या चित्रपटात श्रवरी वाघ देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, जी यशराज बॅनरच्या बंटी और बबली 2 या चित्रपटाद्वारे डेब्यू करत आहे.

सन 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेले नाही. चित्रपटात जुनैद एका ढोंगी बाबाला उघडकीस आणणार्‍या माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

१९६२ मधील जिजनाथजी आणि बृजनाथजी महाराजांच्या प्रकरणातील एका खऱ्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात जुनैद एका वृत्तपत्राचा संपादक म्हणून दिसणार आहे.जुनैद इश्क या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आधी होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याने ऑडिशन देखील दिलं होते.

परंतु दिग्दर्शक निरज पांडे याने त्याला रिजेक्ट केलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार जुनैद त्या भूमिकेत फिट बसत नव्हता त्यामुळे कास्टिंग टीमने त्याला नकार दिला. परंतु या नकारामुळे जुनैद नाराज झालेला नाही. मी आणखी मेहनत करुन पुन्हा प्रयत्न करेन असं तो म्हणाला. जुनैदला अभिनयाची प्रचंड आवड आहे. सध्या तो जर्मनीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे.

विशेषत: त्याला चित्रपटांऐवजी नाटकात काम करण्यात अधिक आवड आहे. आजवर त्याने अनेक इंग्रजी आणि जर्मन भाषेतील नाटकांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. आमिर खानच्या पीके या चित्रपटात त्याने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *