अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ मराठमोळ्या बॉडीगार्डला किती पगार मिळतो माहितीये का? वाचून चकित व्हाल..

बॉलिवूडमध्ये नशीब बदलायला वेळ लागत नाही. असं म्हणतात की, बॉलिवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी नशीब बदलत. प्रत्येक शुक्रवारी एक नवीन सिनेमा रिलीज होतो, आणि त्यावर त्या कलाकारांचे भविष्य ठरते. काही कलाकारांना कधीकधी प्रसिद्धी भेटण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागतो.
तर कधीकधी पहिल्याच सिनेमात त्यांना भरघोस यश मिळते आणि लोकप्रियतेच्या शिखरावर ते जाऊन पोहोचतात. जितकी जास्त प्रसिद्धी तेवढी जास्त लोकप्रियता, म्हणजेच तेवढी जास्त फॅन फॉलोविंग. त्यामुळे कलाकारांना आसपास आणि इतरत्र वावरताना सहाजिकच सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो. अनेक वेळा हे चाहते अनपेक्षित प्रमाणे आपले प्रेम व्यक्त करतात.
काही चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी आणि त्यांची केवळ एक झलक बघण्यासाठी, काहीही करण्यास तयार होतात. अनेक वेळा आपण पाहिले आहे की, हे फॅन्स आपल्या कलाकारांसाठी आपल्या आवडत्या स्टार्सच्या प्रेमापोटी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. मात्र ते करत असताना आपल्या आवडत्या स्टारला आपल्यामुळे धो’का होऊ शकतो, हेदेखील त्यांच्या लक्षात येत नाही.
त्यामुळे या बॉलीवुड कलाकारांसाठी प्रसिद्धी जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. त्याच्या बॉडीगार्ड म्हणजेच, सुरक्षा रक्षकांवर मोठी जबाबदारी असल्यामुळे ते बऱ्याच वेळा चर्चा देखील येतात. मधल्या काळात सलमान खानने बॉडीगार्ड सिनेमा करून संपूर्ण बॉडीगार्ड चे मानधन किती आहे हे बघण्यास भाग पाडले होते.
त्याचा स्वतःचा बॉडीगार्ड शेरा हा देखील कायम प्रकाशझोतात असतो. सध्या अमिताभ बच्चनचे बॉडीगार्ड शिंदे यांची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची नुकतीच बदली झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून जितेंद्र शिंदे, अमिताभ बच्चनचे बॉडीगार्ड म्हणून काम पाहत आहेत.
दरम्यान पो’लिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यांची बदली केली आहे. असं सांगितलं जात आहे की, अमिताभ बच्चन त्यांना जवळपास दीड कोटी पगार देत होते. मात्र हे कायद्याच्या बाहेर आहे, त्यामुळे या प्रकरणात चौ’कशीचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान जितेंद्र शिंदे 2015 पासून बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी काम करत आहेत.
मात्र सध्या सांगितले जात आहे की, त्यांनी स्वतःची सुरक्षा एजन्सी सुरू केली आहे. पो’लीस कमिशनर नगराळे यांच्याकडे या संदर्भातील माहिती पोहोचली आणि त्यानंतरच शिंदे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार कोणताही एक पोलीस एकाच स्टेशनमध्ये चार वर्षांपेक्षा अधिक काळ राहू शकत नाही.
कमिशनर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, नगराळे यांनी हे फर्मान जारी केलं होतं. शिवाय स्वतः सरकारी खात्यात असताना, वेगळा पगार किंवा वैयक्तिक फायद्यासाठी इतर एजन्सी सुरु करणे कायद्याच्या बाहेर आहे. त्याच नियमांतर्गत शिंदे यांची बदली डी बी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
मीडिया कडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांना करण्यात आलेल्या येणाऱ्या पेमेंट संदर्भात अधिक माहितीसाठी अमिताभ बच्चन यांच्या अकाउंट डिपार्टमेंटकडे देखील विचारपूस करण्यात येऊ शकते. शिंदे यांच्या बाबत मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. बारा लाख रुपये महिना अमिताभ बच्चन त्यांना देतात, मात्र सरकारी पगार देखील त्यांना मिळतो आणि त्यामुळेच हे सर्व प्रकरण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर असल्याचे बोलले जात आहे.