अभिमानास्पद ! ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकारांनी अशा प्रकारे केली ‘कोकण’वासीयांना मदत, सोशल मीडियावरून होतंय कौतूक..

अभिमानास्पद ! ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकारांनी अशा प्रकारे केली ‘कोकण’वासीयांना मदत, सोशल मीडियावरून होतंय कौतूक..

कोकण म्हणजे आपल्या राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील एका अतिशय सुंदर असा भाग. कोकणाचे निसर्गरम्य सौंदर्य, कायमच संपूर्ण जगातून अनेक पर्यटक आपल्याकडे आकर्षित करत आले आहे.

एकदा या निरसर्गरम्य कोकणात प्रवेश घेतला की, तिथून निघावं असं कोणालाच वाटत नाही. मात्र, आज अतिवृष्टीमुळे याच कोकणची अतिभ’यंकर अशी स्थिती झाली आहे. मृ’त्यूने जणू तां’डवच मांडले होते, पावसाने आपले रौ’द्ररू’प धारण करुन संपूर्ण कोकण उ’ध्वस्त करुन टाकले आहे. अनेक कुटुंब उ’ध्वस्त झाली आहेत, जनसामान्यांचे हाल होत आहेत.

सांसार मोडून पडला आहे, आणि आता तो कसा उभारायचा हा प्रश्न तेथील रहिवासीयांना पडला आहे. राज्य सरकार आपल्या परीने मदत करत आहे, मात्र ती मदत पुरेशी नाहीये. किंबहुना पुरेशी होऊ पण शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य आणि राज्यातील इतर भागातील जनतेने समोर येऊन मदत करणे आवश्यक आहे, त्याच पार्श्वेभूमीवर आता सुंदरा मनात भरली या मालिकेच्या कलाकारांनी कोकणच्या पूरग्र’स्त लोकांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केला आहे.

सुंदरा मनात भरली या मालिकेने काहीच काळात प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. कोकण, कोल्हापूर, सांगली या भागात देखील या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील अभिनेत्री गौरी किरण मूळची कोकणातील आहे. त्यामुळे कोकणकर ही मालिका अगदी आवडीनं बघतात.

मात्र केवळ आपली मालिका बघण्यापुरतं किंवा टीआरपी पुरतं हे नातं मर्यादित न ठेवता आता या मालिकेच्या कलाकारांनी आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी समजून घेऊन मोठं पाऊल उचललं आहे. आपलं आणि कोकणकरांच्या आपुलकीच्या नात्याची जाणीव ठेवत या मालिकेच्या सर्वच कलाकारांनी कोकणकरांसाठी मदतीची हाक आपल्या चाहत्यांना दिली आहे.

भरत जाधव वगळता, आता प्रथमच इतर मराठी कलाकारांनी पू’रग्रस्तां’साठी मदतीची हाक दिली आहे. यासाठी सुंदरा मनात भरलीच्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन एक व्हिडियो आपल्या अधिकृत आणि वैयक्तिक सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये त्यांनी कोकणवासियांसाठी जास्तीत जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, म्हणजेच सुका मेवा, बिस्कीट, इ., कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला आणि पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर व’स्त्रे, अंथरून-पांघरुण कोकणवासियांपर्यंत पोहोचवून त्यांना या सं’कटातून सावरण्यासाठी मदत करा, असं आवाहन केलं आहे.

या मालिकेमध्ये प्रमुख पात्राची म्हणजेच लतिकाची भूमिका रेखाटणारी अक्षया नायक आज या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली आहे. अक्षया सध्या आपली समाजाकडे काही जबाबदारी म्हणून पूर परिस्थिती मदतीसंदर्भात योग्य ती माहिती जनसामान्य आणि इतर मदतीसाठी पुढे येणाऱ्यांपर्यंत पुरवण्याचे महत्वाचे काम करत आहे.

‘माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. चाहत्यांचा एक मोठा वर्ग आपल्याला फॉलो करत असतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत गरजू लोकांची माहिती गेली आणि कोणाला मदत झाली तरी त्याचं समाधान आहे. या भावनेने सध्या मी माहिती पोहोचवतेय’, असं अक्षयानं सांगितलं आहे. याच मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच समीर परांजपे बोलला की,’राजापूर, चिपळूण कोल्हापूरला या पूराचा सर्वाधिक तडाखा बसलाय.

अजूनही बचावकार्य सुरुच आहे. या परिस्थिती सदैव सुंदर असणाऱ्या कोकणाची झालेली द’यनीय अवस्था पहावेनाशी झालीय. सध्याच्या पूर संक’टात आपल्या परीने शक्य तितकी कोकणवासीयांना मदत करा, तरंच कोकण पुन्हा नव्या उमेदीने उभं राहिल, या संक’टातून स्वतःला सावरेल.’ दरम्यान या कलाकारांना सो’शल मी’डियावरुन चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या या हाकेला साद देत, मातीसाठी हात पुढे केला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *