अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा घ’टस्फो’ट ! १५ वर्ष सोबत संसार केल्यानंतर या कारणामुळे घेतला निर्णय…

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा घ’टस्फो’ट ! १५ वर्ष सोबत संसार केल्यानंतर या कारणामुळे घेतला निर्णय…

मि. परफेक्ट म्हणून ओळखल्या जाणारा आमिर खान, आपल्या वैयक्तीक आयुष्यात मात्र चांगलाच इम्परफेक्ट असलेला बघायला मिळत आहे. बॉलीवूड मध्ये काम करताना आपल्या प्रत्येक पात्राशी एकरुप होऊन, भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून आमिर खान, मि परफेक्ट म्हणून ओळखला जातो. त्यातूनच त्याला भरगोस असे यश आणि नावलौकिक मिळाला.

मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्यात तो तेवढा यशस्वी नाही ठरला. नेहमीच त्याचे कोणासोबत तरी अ’फेअर किंवा, कोणत्या तरी अभिनेत्री सोबत जवळीकच्या बातम्या येतच राहिल्या आहेत. त्यातच त्याने आपली पहिली पत्नी रीना दत्ता सोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांच्या चर्चेला उधाण आलं होत.

त्याच कारण किरण राव आहे असं जरी सगळे म्हणत असले तरीही, किरणच्या प्रेमात पडण्यापूर्वी त्याचे काही अभिनेत्री आणि एका विदेशी महिला पत्रकारासोबत असलेल्या अ’फेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. आमिर खान याचे विदेशी महिला पत्रकार जेसिका हिणेस, सोबत अफेअर होते आणि त्या दोघांचा एक मुलगा देखील आहे असे सांगितले जाते.

या सर्व बाबींमुळे रीना आधीच खूप जास्त डिस्टर्ब होती, आणि त्यामुळे २००० मध्ये त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा घ’टस्फो’ट झाला. किरण आणि आमिरच्या नात्याबद्दल, खुद्द आमिरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, “२००१ साली आम्ही ‘लगान’ फिल्मचं काम करत होतो. किरण राव या सिनेमाची असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यावेळी काम करत होती.

आम्हा दोघांची त्यावेळी केवळ एकमेकांशी ओळख झाली होती. माझ्या घ’टस्फो’टाच्या फॉर्मॅलिटी झाल्यानंतर, एकदा मी आणि किरण अर्धा तास फोनवर बोलत होतो. फोन ठेवल्यानंतर मला तिच्याशी आणखी बोलावसं वाटत होतं. या फोन कॉलनंतर आम्ही एकमेंकांना भेटायला लागलो. आणि त्यानंतर दीड वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.

“लगान सिनेमाच्या वेळी, किरण आणि आमिर अधिकच जवळ आले होते. त्यांच्यामधील प्रेम आणि जावळीक वाढली आणि त्यानंतर २००५ मध्ये दोघांनी लग्न केलं. त्या दोघांचे नाते अगदी परफेक्ट आहे असेच नेहमी दिसत होते. मात्र आता लग्नाच्या १५ वर्षांनी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घ’टस्फो’टाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे.

यामुळे संपूर्ण बॉलीवूड सहित, त्या दोघांच्या चाहत्यांना देखील मोठा ध’क्का बसला आहे. आमिर आणि किरण या दोघांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी केलं आहे. यामध्ये त्यांच्या घ’टस्फोटाबद्दल माहिती देण्यात आली आहे. आमिर-किरणचा १५ वर्षांचा परफेक्ट दिसणारा संसार मोडल्याने चाहत्यांनी देखील मोठे आश्चर्य व्यक्त केलं आहे.

त्यांनी प्रदर्शित केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘आम्हाला आयुष्यात नवीन चॅप्टरची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून’. घ’टस्फो’टाच नक्की कारण अजून देखील कोणीच सांगितले नाहीये, मात्र या जगात परफेक्ट असं काहीच नसत हे, मि परफेक्टनेच पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *