अभिनय सोडून मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी सुरू करतोय नवीन व्यवसाय, पाहून चकित व्हाल…

अभिनय सोडून मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी सुरू करतोय नवीन व्यवसाय, पाहून चकित व्हाल…

मराठी चित्रपट सृष्टी आणि हिंदी चित्रपट सृष्टी दोन्ही प्रेक्षकांचे पसंतीस उतरणारी चित्रपटनगरी आहे. मराठी चित्रपट सृष्टी देखील प्रसिद्धीच्या बाबतीत हिंदी फिल्मी दुनियेपेक्षा काही कमी नाहीत. मराठी चित्रपट सृष्टीत असेही अनेक कलाकार आहेत ज्यांनी मराठी चित्रपटात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे.

अशातच आपन आज ज्या मराठ मोळ्या अभिनेत्याबद्धल जाणून घेणार आहोत तो आहेत अंकुश चौधरी. ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांमध्ये अंकुश चौधरीने काम केले आहे आणि लोकांचे मनोरंजन केले आहे. अंकुश च्या अभिनयाने चाहते देखील मोहून गेलेले आहे.

अंकुश चौधरीने मागील पंचवीस वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम करून त्याने ४० पेक्षाही जास्त चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून त्याचा मराठी फिल्मी क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य यशाच्या वाटेवर नक्कीच नेईल, याची सर्वांना खात्री वाटते.

प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया नेटवर्क चे संस्थापक राहुल नार्वेकर यांनी नुकतीच ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली. या घोषणेपासून मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

या मध्ये भागीदारी साठी अंकुश सोबत देखील चर्चा होऊन पार्टनरशीप साठी विचारले नंतर अंकुश चौधरीने उत्तर दिले की “मला ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ ची संपूर्ण संकल्पना आवडली आहे. आणि जेव्हा असे समजले की नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर हे संस्थापक असल्याचे समजले तेव्हा अशा टॅलेंटेड लोकांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी एक नवीन अनुभव असेल.

म्हणून मी लगेचच यासाठी सहमती दर्शवली. मराठी मनोरंजन क्षेत्र झ पाट्याने बदलत आहे आणि मराठी आशयासाठी असलेल्या या स्वतंत्र ओटीटी माध्यमाच्या निर्मितीमुळे मराठी कलाकारांना नामी संधी उपलब्ध होणार आहे.

अशातच ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ च्या येण्याने नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. यात ओरिजनल मराठी चित्रपट, वेबसिरीज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरीस्, इत्यादी दाखविले जातील. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगला त्याचप्रमाणे इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर आणि नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत काम करायला ही मजा येईल, कारण दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि आम्ही तिघे मिळून जगभरातील मराठी भाषिक प्रेक्षकांना चांगला मजकूर देण्याचा नेहमीच प्रयत्न करू. गेल्या काही वर्षांमध्ये, दर्जेदार आशय निर्माण झाल्याने मराठी मनोरंजन क्षेत्र प्रगतीपथावर पोचले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *