अभिनयासोबतच स्वतःचा साईड बिजनेस करून खूप पै’सा कमवतात ‘या’ 5 अभिनेत्र्या, पहा सनी लिओनी करते हा बिजनेस…

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपटात तसेच साइड बिझिनेसमध्ये काम करून भरपूर पैसे कमवतात. अभिनेत्यांसोबत आत अनेक अभिनेत्रीसुद्धा बिजनेस करण्यात पुढे गेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी सिनेमाच्या अशा 5 अभिनेत्रींची माहिती देत आहोत. बॉलिवूडमधील या पाच यशस्वी अभिनेत्रीनी आता त्यांचा स्वताचा बिजनेस सुरु केला आहे. चला तर मग या अभिनेत्री आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया..
१. सनी लिओनी:- पहिला एक पो’र्न स्टार आणि नंतर बॉलिवूड अभिनेत्री बनलेल्या सनी लिओनीने इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले आहे. सनीने निश्चितच आता पो’र्न चित्रपटांना निरोप दिला आहे, परंतु ती अजूनही या उद्योगाशी कुठेतरी जोडून आहे.
कारण तिने एक अॅडल्ट शॉप उघडले आहे. अॅडल्ट टॉयस, आकर्षक पोशाख, पार्टी वेअर, स्विम वेअर यासारखी उत्पादने यात उपलब्ध आहेत. तसेच, सनी लिओनीने ‘वासना’ नावाची परफ्यूम आणि कॉस्मेटिक लाइन देखील चालवते. यामधून ती को’टी’ची कमाई करत आहे.
२. सुष्मिता सेन:- बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर होती, परंतु असे असूनही ती सुद्धा आजही को’टी मध्ये कमावते. सुष्मिताची स्वतःची ज्वेलरी लाईन आहे जी बरीच लोकप्रिय आहे. सुष्मिता सेनचा हा बिजनेस तिच्या आ’ईने चालू केला होता. तर सुष्मिता सेनची स्वतःची तंत्रा एंटरटेनमेंट नावाची प्रॉडक्शन कंपनी देखील आहे.
३. दीपिका पादुकोण:- दीपिका पादुकोण ही आजच्या काळातील सर्वात महागडी, प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहे. ती एकामागून एक हि-ट चित्रपट देत आहे. आज प्रत्येकाला दीपिका पादुकोण आवडते. चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या बिजनेस मधून देखील कमाई करते. दीपिकाने काही वर्षांपूर्वी स्वत: ची ऑनलाईन फॅशन लाईन ‘ऑल अबाउट यू’ लाँच केली होती आणि तिचे ऑनलाइन फॅशन प्लॅटफॉर्म Myntra या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
४. अनुष्का शर्मा:- खूप कमी काळात अभिनेत्री अनुष्का शर्माने इंडस्ट्रीत एक मोठे नाव कमावले आहे. ती एक यशस्वी अभिनेत्री तसेच एक बिजनेस वूमन देखील आहे. अनुष्का आणि तिच्या भावाने स्वत: ची फिल्म प्रोडक्शन आणि वितरण कंपनी ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ उघडली आहे. यामध्ये तिने एनएच 10, फिल्लौरी आणि परी सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. त्याचवेळी अनुष्काकडे नुश नावाची कपड्यांची लाईनसुद्धा आहे.
५. कतरिना कैफ:- कतरिना कैफ तिच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच सौंदर्यासाठीही खूप लोकप्रिय आहे. बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेत्री मध्ये तिची गणना केली जाते. ती एक यशस्वी अभिनेत्री तसेच एक बिजनेस वूमन आहे. भारतीय सौंदर्य विक्रेता नायका च्या भागीदारीसोबत तिने स्वत: चा ब्यूटी ब्रँड काय ब्यूटी हा उघडला आहे. कतरिनाचा हा ब्युटी ब्रँड सध्या मुलींमध्ये चांगलाच चर्चेत आहे.