अभिनयासह साईड बिजनेस करून अमाप संपत्ती कमवतात हे 6 कलाकार, पहा नंबर 2 चा बिजनेस आणि कमाई बघून पायाखालची जमीन सरकेल…

बॉलिवूडचे हे जग आपल्यासाठी खूपच आकर्षक आणि डोळ्यात भरणारे असते. बॉलीवूडमधील कलाकारांच्या जीवनशैलीमुळे आपल्याला मनावर एक वेगळीच छाप पडलेली असते. या बॉलिवूडमधील कलाकारांकडे अमर्याद असे पैसे आहेत हे आज पर्यंत कुणापासून लपलेले नाही. फ्लॉप्ड कलाकार सुद्धा आपले जीवन सहजतेने जगताना आपल्याला दिसत असतात.
याचे एक कारण असे आहे की बरेच कलाकार त्यांच्या अभिनयासह अनेक साईड बिजनेस देखील करतात. अशा परिस्थितीत त्यांना अतिरिक्त पैसा देखील मिळतो. अशा प्रकारे, ते आपले महागडे शौक देखील पूर्ण करण्यास सक्षम असतात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्याला बॉलीवूडच्या काही खास कलाकारांची ओळख करुन देणार आहोत, ज्यांचा साइड बिझिनेस त्यांना अति श्रीमंत बनवत आहे.
1) अजय देवगण :- अजय देवगन अजूनही चित्रपटांमध्ये खूप सक्रिय असतो आणि त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतात. तसेच अजयचे स्वतःचे ‘देवगन एंटरटेनमेंट सॉफ्टवेअर लिमिटेड’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. याशिवाय त्याने रोजा ग्रुपच्या 25 मेगावॅटच्या प्लांटमध्ये देखील पैसे गुंतवले आहेत. एवढेच नव्हे तर गुजरातमधील सौर प्रकल्प ‘चारनाका’ मध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.
2) सुनील शेट्टी :- सुनील शेट्टी याची चित्रपट कारकीर्द खूप यशस्वी ठरली आहे. पण सुनील शेट्टी हा एक यशस्वी उद्योजकही आहे हे फार कमी लोकांनाच ठाऊक असेल. सुनीलचे स्वतःचे ‘पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. यासोबतच त्याने तरुणांई साठी अनेक आकर्षक नाईट क्लब आणि रेस्टॉरंट्सही बनवले आहेत. त्यामुळे सुनील शेट्टी किती पैसे कमावत असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
3) अक्षय कुमार :- अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये आजही यशस्वी अभिनेता म्हणून काम करत आहे. तसेच तो सर्व अभिनेत्यांपेक्षा जास्त टॅक्स भरतो अशी देखील बातमी आहे. कदाचित यामागे एक कारण असू शकते की त्याचे अभिनयाशिवाय बरेच बिजनेस देखील असतील. अक्षयने आपले ऑनलाइन शॉपिंग चॅनल ‘बेस्ट डील टीव्ही’ हे राज कुंद्रासोबत नुकतेच पार्टनरशिपमध्ये चालू केले आहे. यासोबतच त्याचे ‘हरि ओम एंटरटेनमेंट’ नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
4) माधुरी दीक्षित :- बॉलिवूडची मनमोहक अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. पण नुकतेच तिने आपली नृत्य अकादमी सुरु केली आहे. शिवाय तिची अनेक कंपन्यांच्यामध्ये भागीदारी सुद्धा आहे. त्यामुळे ती करोडो रुपये सध्या काम न करता कमावत आहे. शिवाय तिचा पति देखील एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहे.
5) बॉबी देओल :- बॉबी देओल याची फिल्मी कारकीर्द खूप चढउतारांनी भरली आहे. पण बर्याच दिवसांच्या नंतर तो आपल्याला रेस 3 सारख्या चित्रपटाद्वारे पुनरागमन करताना दिसला पण तो चित्रपटही फ्लॉप झाला. पण बॉबी हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्यामुळेच तो आपल्याला ‘हाऊसफुल 4’ मध्ये दिसला आणि नुकतीच त्याने एक ‘आश्रम’ नावाची वेब सिरिज देखील केली आहे जी खूपच लोकप्रिय ठरत आहे.
पण अभिनया व्यतिरिक्त बॉबी एक चांगला डीजे देखील आहे. त्याने याची सुरुवात २०१६ मध्ये दिल्लीतील एका नाईट क्लबने केली होती. त्याचे सध्या भारतात अनेक नाईट क्लब आहेत. ज्यापासून तो लाखो रुपये रोज कमावत असतो.
6) मलायका अरोरा :- अर्जुन कपूरसोबतच्या प्रेमसं-बंधांमुळे सध्या चर्चेत असलेली मलायका अरोरादेखील अनेक साइड बिजनेस करते. तसे तर मलायकाला बॉलिवूडमध्ये फक्त आयटम डान्सच्या ऑफर मिळतात. ती कोणत्याही चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपल्याला जास्त दिसत नाही.
परंतु असे असूनही, तिची जीवनशैली विलासी आणि आकर्षक आहे. खरं तर, मलायकाने बिपाशा बासू आणि सुझान खान यांच्यासमवेत फॅशन सं-बंधित एक वेबसाइट चालू केली आहे. ‘द लेबल लाइफ’ असे या वेबसाइटचे नाव आहे. ज्यापासून ती लाखो रुपये कमावत असते.