काय सांगता ! सोन्याइतकाच महाग आंबा ! ‘या’ प्रकारच्या आंब्यामुळे शेतकरी झाले मालामाल, झाडाला आंबा येण्याआधीच होतो बुक…

सध्या पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत. मात्र, अजूनही आंब्याचा सीझन हा सुरूच आहे. आंबे साधारण अजून एक महिनाभर खाता येतील. त्यानंतर मात्र आंबे आपल्याला खाता येणार नाही. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्यामध्ये कीटक, आळ्या निघत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आंबे अधिक खाणे चांगले नसते.
मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात आपण आंबे आवर्जून खात असतो. केसर, लंगडा, लालबाग, हत्ती, दशहरी या सारख्या आंब्याच्या प्रजाती आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहेत. या शिवाय बदाम हा आंबा देखील खूप प्रसिद्ध असतो. मात्र, सध्या सर्वार्थाने केशर या आंब्याला खूप मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. केशर हा मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालत असतो.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर देखील या आंब्याला खूप मोठी मागणी आहे. मात्र, आंब्याची चर्चा झाली आणि हापूस चे नाव आले नाही, असे कधीच होत नाही. हापूस हा अंबा सर्वांचा राजा म्हटले तर वावगे ठरू नये. हापूस आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. हापूसमध्ये देखील खूप प्रकार आहेत. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस यासारखे प्रकार आहेत.
हापूस हा अतिशय मिठास पूर्ण असा असतो. हापूसच्या एका पेटीमध्ये बारा आंबे येतात आणि ही पेटी जवळपास तीन ते चार हजार रुपये पर्यंत भेटते. आता बाजारांमध्ये हजार ते पंधराशे रुपयेला देखील ही आंब्याची पेटी मिळते. मात्र, यामध्ये कृत्रिम प्रक्रिया केलेली असते. मात्र, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा असतो.
हा आंबा खाण्यासाठी खूप चांगला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कैरीचे लोणचे देखील घालत असतात. लोणच्याचा आंबा हा वेगळ्या पद्धतीचा बाजारात मिळत असतो. आज आम्ही आपल्याला एका अशा आंबा बद्दल माहिती देणार आहोत. हा आंबा जवळपास दोन ते अडीच किलोचा असतो. आणि आंब्याचा भाव जवळपास हजार रुपये नग प्रमाणे असतो.
या आंब्याचे नाव ‘नूरजहा’ असे आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, खरे आहे. या आंब्याचे नाव असेच आहे. हा आंबा मध्यप्रदेश मध्ये पिकवला जातो. मध्यप्रदेशच्या आलीशहापूर येथील काठी वाडा या गावांमध्ये या आंब्याचे उत्पादन घेण्यात येते. आता गुजरातमध्ये देखील आंब्याचे उत्पादन घेण्यात येत आहे.
हा आंबा खाण्यासाठी अतिशय रसदार आणि पौष्टिक असा असतो. आंब्याची जात सध्या मध्य प्रदेशात आढळून येत असल्याचे सांगण्यात येते. हा अंबा जवळपास अडीच ते तीन किलोचा एकच असतो आणि त्याला जवळपास पाचशे ते एक हजार रुपयाचा भाव मिळत असल्याचे सांगण्यात येते.
मूळ अफगाणिस्तानचा
अफगाणिस्तानमध्ये ड्रायफ्रूट्स हे मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. त्याचप्रमाणे तिकडे फळे देखील खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. नुरजहा हा आंबा मूळ अफगाणिस्तानातल्या असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ इशारा मंसुरी यांनी सांगितले. नुरजहा आंब्याला सध्या चांगली मागणी असल्याचे देखील ते म्हणाले.
आगाऊ बुकिंग करावी लागते
जर आपल्याला नूर जहा आंबा खायचा आहे, तर यासाठी आपल्याला एका प्रक्रियेतून जावे लागते. कारण की, हा आंबा सहजासहजी मिळत नाही. हा आंबा विकत घेण्यासाठी आपल्याला आधी बुकिंग करावी लागते. त्या नंतरच आपल्याला हा आंबा मिळतो, असे देखील इशाक मन्सूर यांनी सांगितले आहे.