अनुष्काने पहिल्यांदा सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो, ट्विटर वर ट्रेंड होतेय मुलीचं नाव…

अनुष्काने पहिल्यांदा सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो, ट्विटर वर ट्रेंड होतेय मुलीचं नाव…

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. या लोकप्रिय जोडप्यांना ११ जानेवारी २०२१ ला कन्यारत्न प्राप्त झाले होते. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहितीसुद्धा आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

विराट आणि अनुष्का यांची मुलगी दिसायला कशी असेल? तिचं नाव काय असेल? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असतानाच या दोघांनीही नुकताच त्यांच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर करत तिच्या नावाचा खुलासादेखील केला आहे.

अनुष्का आणि विराट यांनी आपल्या लेकीचे नाव काय ठेवावे? यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेक पर्याय सुचवले होते. अनुष्काने ज्या रु’ग्णाल’यात बा’ळाला ज’न्म दिला होता त्या ठिकाणी नोंदणी अर्जावर बाळाचे नाव अन्वी ठेवण्यात आल्याचे बोलले जात असल्याने या नावाची चर्चा सर्वत्र रंगली होती. परंतु या चर्चेला पूर्णविराम देत त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. त्यामुळे आता सर्वांना या नावाचा काय अर्थ आहे? याबद्दल उत्सुकता लागली आहे.

काय आहे ‘वामिका’ चा अर्थ:- त्या दोघाप्रमाणेच त्याच्या मुलीचे नावही खूप खास आहे. आपणास सांगू इच्छितो कि वामिका हे नाव विराट आणि अनुष्काचे नाव एकत्र करून बनवले आहे. विराटचा ‘व्ही’ आणि अनुष्काचा ‘का’या नावात समावेश आहे.

वामिका देवी दुर्गा यांचे विशेषण आहे. अनुष्का-विराटच्या मुलीच्या फोटोची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. म्हणूनच अनुष्काने पोस्ट शेअर केल्याच्या पाच मिनिटांत या फोटोला लाखोहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

अनुष्काचे कॅप्शन:- मुलीचा पहिला फोटो संस्मरणीय बनवण्यासाठी अनुष्का शर्माने खूप खास कॅप्शन दिले आहे. अनुष्का शर्माने लिहिलं की, “आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो, पण, या छोट्याशा वामिकाने याला नवीन स्तरावर आणले आहे. अश्रू, हास्य, चिंता, आनंद – या अशा भावना आहेत, ज्या आम्ही एका क्षणात अनुभवल्या आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ”

११ जानेवारीला झाला वामिकाचा ज’न्म:- ११ जानेवारीला अनुष्काला मुलगी झाली होती. त्यादिवशी विराट कोहलीने आपल्या सोशल मीडियावर देखील बाबा झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. वडील झाल्यानंतर आनंदाची बातमी सांगताना विराट कोहलीने सांगितले होते की, “हे सांगताना आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत”


मुलीच्या ज’न्मानंतर विराट कोहली सुट्टीवर होता. पण तो आता क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी तो चेन्नईला गेला आहे. ५ फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात होईल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *