अतिशय सुंदर दिसते डॉ. अमोल कोल्हे यांची बायको, ‘या’ क्षेत्रात आहे आघाडीवर, पहा फोटो….

मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिकांमध्ये असे काही अभिनेते आहेत की, जे उच्च शिक्षीत असून देखील चित्रपट आणि अभिनयाकडे वळाले आहेत. याचे कारण देखील तसेच आहे. त्यांचे मन हे अभिनयामध्ये लागलेले आहे. असे अनेक कलाकार आहेत की, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी मिळवल्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये आपला जम बसवलेला आहे.
यात अनेक अभिनेत्यांचा समावेश होत असतो. आज आम्ही आपल्याला एका मराठमोळ्या अभिनेत्याला बद्दल माहिती देणार आहोत. या मराठमोळ्या अभिनेत्याचे नाव आहे, डॉक्टर अमोल कोल्हे. डॉक्टर अमोल कोल्हे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आलेले आहेत.
त्यांनी दिग्गज अशा शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला होता. त्यानंतर संसदेमध्ये देखील त्यांनी आपल्या भाषणाने छाप सोडली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे झालेला आहे. 18 सप्टेंबर 1980 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामसिंग कोल्हे, तर आईचे नाव रंजना असे आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण नायगाव येथे झाले, तर पुणे येथे नंतर त्यांनी शिक्षण घेतले. तर मुंबई येथून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. राजा शिवछत्रपती ही मालिका त्यांची प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका केली.
2007 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव अश्विनी असे आहे. त्यादेखील उच्चशिक्षित आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे जिथे जातात तिथे आपल्या चाहत्यांचे मन जिंकून घेत असतात. आपल्या बोलण्याच्या पद्धतीने व लकबी ते सर्वांनाच आवडतात. आज आम्ही त्यांच्या पत्नी बद्दलही आपल्याला माहिती देणार आहोत.
डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जीवनामध्ये पत्नी अश्विनी यांचा खूप मोलाचा वाटा आहे. सहा डिसेंबर 2007 रोजी डॉक्टर अमोल कोल्हे व अश्विनी यांचे लग्न झालेले आहे. अश्विनी देखील एक डॉक्टर आहेत. त्या एका महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतात. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये अश्विनी यांचा खंबीरपणे पाठिंबा असतो.
डॉक्टर अमोल कोल्हे यांचे देखील पत्नी बद्दलचे प्रे’म हे जगजा’हीर आहे. आपल्या प’त्नीबद्दल ते अनेकदा इतरांना सांगत असतात. माझी पत्नी म्हणजे माझा एक आरसाच आहे, असे ते म्हणत असतात. तसेच तिच्या पाठिंब्यामुळेच आपण आजवर पर्यंत आलो, असे देखील त्यांनी अनेकांना सांगितले आहे.