‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये पत्नीव्रता अभिजीत राजेंनी खऱ्या आयुष्यात केली 2 लग्न, पहा दुसरी बायको दिसते कमालीची सुंदर…

‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये पत्नीव्रता अभिजीत राजेंनी खऱ्या आयुष्यात केली 2 लग्न, पहा दुसरी बायको दिसते कमालीची सुंदर…

टीव्हीवर येणाऱ्या मालिका, सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. या मालिकांचे वेड सुरुवातीच्या काळापासूनच प्रचंड वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. या मालिकांमध्ये एकदा कलाकारांना एखादी ओळख मिळाली की, तीच त्यांची आयुष्यभरासाठी ओळख बनून जाते.

कलाकार जेव्हा ते पात्र किंवा भूमिका रेखाटत असतात तेव्हा, प्रेक्षक विसरून जातात कि ती केवळ एक भूमिका आहे. खऱ्या आयुष्यात त्या कलाकारांचे व्यक्तित्व त्या पात्रांशी एकरूप असेलच असे नाही. अनेक वेळा आपण पहिले आहे की, मालिकांमध्ये घुंगटमध्ये असणारी बहू, खऱ्या आयुष्यात बिनधास्त शॉर्ट्स आणि मिनीस्कर्ट मध्ये फिरत असते.

सहाजिकच कोणतीही भूमिका आणि ते कलाकार हे दोघेही वेगळे आहेत, असे चाहत्यांच्या ध्यानातच येत नाही. मात्र, या भूमिकांमुळे या कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळते. सध्या अश्याच एका मालिकेची सगळीकडेच चर्चा होत आहे. हि मालिका प्रेक्षकांना इतकी जास्त आवडली की, आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अग्गबाई सासूबाई या मालिकेने भरगोस यश मिळावले आणि या मालिकेचे टीआरपी रेटिंग्स देखील चांगले होते. अग्गबाई सुनबाई हा याच मालिकेचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमधील सर्वच पात्रांनी खूप लोकप्रियता कमावली. खास करुन अभिजित राजे म्हणजेच गिरीश ओक यांना देखील या मालिकेमधून एक नवीन ओळख मिळाली.

त्यांच्या भूमिकेला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळाले आहे. प्रेमामध्ये एकनिष्ठ असणाऱ्या, अभिजित राजे यांच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच दाद दिली. नवरा असवा तर अभिजीत राजेसारखा असं महिलावर्ग म्हणत आहेत. मात्र, असं असलं तरी खऱ्या आयुष्यात गिरीश ओक यांची दोन लग्नं झाली आहेत. डॉ.गिरीश ओक यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमधून डॉक्टरकीची डिग्री घेतली.

काही वर्ष त्यांनी प्रॅक्टीस देखील केली मात्र त्यात मन न लागल्यामुळं, त्यांनी अभिनयाकडं आपला मार्ग वळवला. सुरुवातीला मालिका, नाटकांमधून त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मग त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी गिरीजा आली. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही आणि काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री दोघांनीही घ’टस्फो’ट घेतला.

गिरीजा आज केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतील देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपली पहिली पत्नी पद्मश्री यांना घ’टस्फो’ट दिल्यानंतर २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. गिरीश आणि पल्लवी या दोघांना दुर्गा नावाची मुलगी आहे. गिरीश ओक आपल्या यशाचं श्रेय आपली दुसरी पत्नी पल्लवी यांनाच देतात.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते आपल्या नात्याबद्दल सांगताना बोलतात, ‘कोणत्याही अभिनेत्याला आपल्या आयुष्यात एक मजबूत आधाराची गरज असते. आणि तोच आधार मला पल्लवीने दिला आहे. मला जेव्हा पण गरज भासली तेव्हा, तिने मला साथ दिली. माझं पाहिलं लग्न यशस्वी नाही ठरलं पण, दुसऱ्या लग्नात मी अत्यंत समाधानी आहे.

आमचे प्रेम हे आमच्या अंडरस्टॅण्डिंग मधून दिसून येते.’ सुरुवातीच्या काळात गिरीश यांनी अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले मात्र, ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवले. ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘आराधना’, ‘पिंजरा’, ‘अग्निहोत्र’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘अवंतिका’, ‘निवडुंग’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांमध्ये तर ‘जसा बाप तशी पोरं’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘शिवरायांची सून ताराराणी’, ‘लावण्यवती’, ‘विश्वविनायक’, ‘सातच्या आत घरात’, ‘झुळूक’, ‘आम्ही असू लाडके’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘तानी’ या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *