‘अग्गबाई सासूबाई’ मधील शुभ्रा आणि सोहमची जोडी पुन्हा आली एकत्र; दोघांनी ‘या’ चित्रपटात…

‘अग्गबाई सासूबाई’ मधील शुभ्रा आणि सोहमची जोडी पुन्हा आली एकत्र; दोघांनी ‘या’ चित्रपटात…

आज मालिकांचे स्थान सर्वांच्याच कुटूंबात अगदी मोठे झाले आहे. या मालिका बघताना अनेकजण तल्लीन होऊन जातात. त्यामधील पात्र, मालिकांच्या चाहत्यांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक बनून जातात. अशा अनेक मालिका आहेत, ज्यांचे पात्र खूपच प्रसिद्ध आहेत.

मालिकांमधील जोडया तर चाहत्यांना खास आवडतात आणि काही जोड्या खूपच जास्त लोकप्रियता कमवतात. या लोकप्रिय जोडी जेव्हा मालिका संपल्यानंतर, एखादी जोडी पुन्हा पडद्यावर बघायला मिळाली तर चाहते अजूनच जास्त खुश होतात. तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की या जोडीने काही महिन्यांपूर्वी सगळीकडेच जोरदार चर्चा रंगवली होती.

अग्गबाई सासूबाई या मालिकेत त्या दोघांनी शुभ्रा-सोहमची भूमिका रेखाटली होती. या मालिकेचे कथानक नेहमीच्या मालिकांपेक्षा काहीसे वेगळे होते. मात्र, शुभ्रा आणि सोहमची प्रेमकथा सर्वांनाच खूप आवडली होती. त्याचबरोबर या मालिकेतील आसावरी आणि अभिजितची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

काही कारणास्तव तेजश्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि शुभ्रा व सोहमची जोडी देखील तुटली. त्यानंतर या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातून आसावरी आणि अभिजीतची जोडी तर चाहत्यांना भेटायला येत होती, मात्र शुभ्रा आणि सोहमच्या जोडीची सर्वच जन आतुरतेने वाट बघत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की सोबत काम करणार असल्याचं सांगितलं जात होत.

पण, नक्की कोणत्या सिनेमामध्ये हे सोबत काम करणार, की मालिकेमध्ये यासाठी सर्वच चाहते कमालीचे उत्सुक होते. नुकतीच आशुतोष आणि तेजश्रीची जोडी आता पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, आशुतोषने मुंबई पोलिसांना डेडिकेटेड एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वतः आशुतोषने केले आहे.

त्याने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तो लिहतो, ‘कोणताही प्रोजेक्ट मग तो मोठा असेल किंवा छोटा, तो पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सामान योगदान असते. माझ्यावर विश्वास ठेवून, दिग्दर्शन करण्याची संधी दिली याबद्दल खूप आभार. तुम्ही माझा हा छोटासा प्रयत्न पहिला आहे का, नसेल तर नक्की बघा आणि काही सुधारणा देखील सांगा.

आशा आहे की तुम्हाला हा सिनेमा आवडेल.’ त्याचा संकरक्षक देवदूत असे या शॉर्टसिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे लेखन तेजश्री प्रधान केले असून, दिग्दर्शन आशुतोष केले आहे. या लघुपटामध्ये, मुंबई पोलिसांना सलाम केला आहे. तेजश्री -आशुतोष या जोडीने पहिल्यांदाच असा लघुपट बनवला आहे आणि त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्यामध्ये अजून थोडी सुधारणा आवश्यक असल्याच बोललं आहे. तर काहींनी, या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

पडद्यावर आपल्या अभियाने कौतुक कमवल्यानंतर आता, तेजश्री-आशुतोषच्या जोडीने लेखन-दिग्दर्शन करुन या शॉर्ट सिनेमामधून देखील चांगलीच दाद मिळवली आहे. तुम्ही दोघे एकत्र येऊन असंच आमचं मनोरंजन करत रहा, आम्हाला तुमची जोडी खूप आवडते असे देखील काही चाहत्यांनी कमेंट केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.