‘अगडबंब’ मधील नाजूका आठवतेय का? चेन्नईतील संगीतकाराशी केलंय लग्न, पहा आजही दिसतेय इतकी ग्लॅमरस आणि सुंदर..

‘अगडबंब’ मधील नाजूका आठवतेय का? चेन्नईतील संगीतकाराशी केलंय लग्न, पहा आजही दिसतेय इतकी ग्लॅमरस आणि सुंदर..

मनोरंजन

मकरंद अनासपुरेचे नाव घेतलं की, नकळत आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटते. दे धक्का सिनेमामध्ये मकरंद अनासपुरे, यांच्या हटके विनोदशैली आणि दमदार अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावलं होत. अस्सल गावठी अंदाज आणि सोबतीला खास विनोदशैली यामुळे, मकरंद अनासपुरे यांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली.

सरकारणामा सारख्या बहुचर्चित सिनेमाने मकरंद अनासपुरे यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला . त्यानंतर, सातच्या आत घरात सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले आहे. मकरंद अनासपुरे यांनी केवळ मराठीच नाही तर अनेक हिंदी सिनेमात देखील काम केले आहे.

कायद्याचं बोला, खबरदार, जाऊ तिथे खाऊ, सासू नंबरी जावई दस नंबरी, गोष्ट छोटी डोंगर एव्हढि, साडे माडे तीन, अगडबंब, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमामध्ये आपल्या दमदार अभिनयाने मकरंद अनासपुरे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचे सर्वच सिनेमा सुपरहिट ठरले आहे आणि आजही ते रसिकांच्या ध्यानात आहेत.

अगडबंब हादेखील त्यापैकीच एक सिनेमा आहे. हा सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला. आजही या सिनेमाचे अनेक चाहते आहेत. २०१० साली अगडबम चित्रपट रिलीज झाला होता आणि या चित्रपटातील नाजुकाने देखील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. तृप्ती भोईरने या नाजूकची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून नाजुकाच्या भूमिकेतून तृप्ती घराघरात पोहचली.

अभिनेत्री तृप्ती भोईर, मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मातीदेखील आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रात देखील तृप्तीने मेहनतीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’, ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ अशा अनेक चित्रपटांचे तृप्तीने दिग्दर्शन केले आहे.

या सर्वच चित्रपटात तृप्तीला खूप चांगले यश मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन कल्पना अंमलात आणल्या. तृप्तीने ‘टुरिंग टॉकीज’, ‘हॅलो जय हिंद’, ‘अगडबम’, ‘तुझ्या माझ्या संसाराला अजून काय हवं’ या चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला. ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये आणि ‘इंद्राक्षी’, ‘सही रे सही’ या नाटकांमध्ये देखील तिने काम केले आहे.

२०१७मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील संगीतकार टी सतीश चक्रवर्थी यांच्यासोबत तृप्ती भोईर लग्नबेडीत अडकली आहे. चेन्नईमध्ये तृप्तीचा विवाह संपन्न झाला. तृप्ती भोईर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तृप्ती भोईरचा, सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटोंवर, लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

तृप्ती सध्या आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. आपल्या पतीसोबत देखील तृप्ती अनेकवेळा फोटोज शेअर करत असते. या नवरात्रीमध्ये, तिने खूप फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. तृप्तीच्या या फोटोंवर चांगलेच लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *