अखेर ४ वर्षानंतर दयाबेनचा शोध संपला; आता ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका ?

अखेर ४ वर्षानंतर दयाबेनचा शोध संपला; आता ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका ?

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने साता समुद्र पार देखील, खूप चाहते कमवले आहेत. जेठालाल आणि त्याचे भले मोठे कुटुंब म्हणजेच गोकुलधाम सोसायटी मध्ये घडणाऱ्या घडामोडी जवळपास दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहे. सध्या हिंदी टेलिव्हिजन मध्ये स्टार प्लस ची मालिका अनुपमा सगळ्यात हिट मालिका आहे.

या नंबर १ साठी, अनेक मालिकांमध्ये चढाओढ नेहमीच बघायला मिळते. मात्र तारक मेहता हि मालिका कधीच या चढाओढीमध्ये नसते. कारण, कितीही मालिका आल्या आणि गेल्या, काही हिट ठरल्या कित्येक दिवस नंबर १ वर राहिल्या. मात्र तारक मेहता कायमच पहिल्या ५ हिट मालिकांमध्ये असते.

आजही इतक्या वर्षानंतर या मालिकेने आपले स्थान अबाधित ठेवले आहे. पण माघील काही वर्षांपासून या मालिकेच्या लोकप्रियतेमध्ये काहीशी घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. त्याचे प्रमुख कारण आहे, दयाबेन. या मालिकेमध्ये जेठाच्या पत्नीची भूमिका साकारणारी दयाबेन माघील काही वर्षांपासून. मालीकेचा भाग नाहीये.

आपल्या मॅटर्निटी लिव्ह नंतर एकदाच दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या मालीकेमध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर त्या मालिकेमधून गायब च आहेत. दयाबेन या पत्राचा देखील खूप मोठा चाहतावर्ग आहे, आणि त्यामुळे अनेक लोकांनी हि मालिका बघण्याचे बंद केले. मात्र आता, दयाबेन या मालिकेमध्ये परत येत आहे.

दिशा वकानी ही भूमिका साकारणार नसून एक प्रसिद्ध आणि अतिलोकप्रिय अभिनेत्री आता हि भूमिका साकारणार आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे, दिव्यांका त्रिपाठी. स्टार प्लसच्या ये है मोहब्बते या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली, रुहीची इशीमा म्हणजेच दिव्यांका आता तारक मेहता मध्ये दयाबेनची भूमिका साकारणार आहे.

झी टीव्हीच्या ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकेमधून टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये पदार्पण करणाऱ्या दिव्यांकाने आपल्या पहिल्याच मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर मात्र दीर्घकाळ ती कोणत्याच मोठ्या भूमिकेमध्ये दिसली नाही. स्टार प्लसच्या ‘ये है मोहब्बते’ या मालिकेने तिला पुन्हा भरगोस लोकप्रियता मिळवून दिली होती.

त्यानंतर रियलिटी टीवी शो खतरों के खिलाड़ी सीजन ११ मध्ये ती पुन्हा एकदा दिसणार असून त्याचे शूटिंग सुरु आहे. मात्र काही मीडिया हाऊसच्या रिपोर्टनुसार या शो नंतर ती लगेच, तारक मेहता साठी शूटिंग सुरु करणार आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी तारक मेहताचे मेकर्स जवळपास ४ वर्षांपासून दयाबेन शोधत आहेत.

अनेक अभिनेत्रींचे नाव या भूमिकेसाठी पुढे आले होते. त्याचबरोबर दिव्यांका सोबत देखील याबद्दल मेकर्सची चर्चा सुरु होती असे सांगितले जात आहे. आता त्याच चर्चेला यश आले आहे आणि लवकरच दिव्यांका दयाबेन म्हणून सर्वाना भेटायला येणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *