अंकुश चौधरीची पत्नीदेखील आहे ‘प्रसिद्ध’ अभिनेत्री, ‘या मालिकेतून पुन्हा येणार आपल्या भेटीला…

अंकुश चौधरीची पत्नीदेखील आहे ‘प्रसिद्ध’ अभिनेत्री, ‘या मालिकेतून पुन्हा येणार आपल्या भेटीला…

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अंकुश चौधरी. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याचा ‘धुरळा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. अंकुशनं याआधी दुनियादारीमध्ये साकारलेला दिघ्या असो मग क्लासमेटमधील सत्या, त्याने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले.

त्यानं नेहमीच प्रत्येक भूमिका कमालीन वठवली. दुनियादारीमध्ये प्रेमाच्या दुनियेत अयशस्वी ठरलेल्या अंकुशची रिअल लाइफ लव्ह मात्र यशस्वी ठरली. 10 वर्षांच्या दिर्घकाळ रिलेशनशिपनंतर अंकुशनं अभिनेत्री दिपा परबशी लग्न केलं.

अंकुश चौधरी आणि दिपा परब एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये हे दोघं लग्नाच्या बे’डीत अ’डकले. आता त्यांच्या लग्नाला जवळापास 12 वर्षं उलटून गेलीत पण या दोघांची लव्हस्टोरी मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. दिपा परब आणि अंकुश चौधरी यांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं.

मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंकुश आणि दिपा यांची ओळख अभिनयामुळेच झाली. दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं होतं.

कॉलेजमधली लव्हस्टोरी पुढेही तशीच राहिली. एकमेकांना जवळपास 10 वर्ष डेट केल्यानंतर दिपा आणि अंकुशनं 2006 मध्ये त्यांच्या नात्याला नवं वळण देण्याचा निर्णय घेत साखरपुडा उरकला. त्यानंतर एका वर्षानं हे दोघं लग्नाच्या बे’डीत अड’कले. आता या दोघांना प्रिन्स नावाचा एक गोड मुलगा सुद्धा आहे.

अंकुश चौधरी अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत फोटो शेअर करत असतो. पण आता दिपा लवकरचं एका मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. अभिनेत्री दीपा परब-चौधरी आता छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवर मालिकेतील फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

आपणास सांगू इच्छितो कि ती स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी की कहानी या मालिकेत लवकरचं दिसणार आहे त्यामुळे आता तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिचे चाहते तिला पुन्हा एकदा अभिनय करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले. त्यानंतर दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती. तसेच केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे.

त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा देखील अधिक लोकप्रिय ठरला. ‘थोडी ख़ुशी थोडा गम’, ‘छोटी मॉ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदी मालिकेत ती झळकली आहे आता लवकरचं ती एका नव्या मालिकेतून आपल्याला भेटायला येत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *